विष पाजून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गुन्हा दाखल

प्रदीप बहुरूपी
Thursday, 15 October 2020

पीडितेने आरडाओरड करताच घरातील फवारणीचे औषध पीडितेस पाजून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतर तिच्या हत्येचा प्रयत्नही केला. गंभीर अवस्थेत पीडितेला वरुडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वरुड (जि. अमरावती): विष पाजून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना वरुड तालुक्यातील एका गावात घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात अत्याचार व हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

उद्धव नासरे (वय ५५), असे आरोपीचे नाव आहे. पीडिता (वय १६)घरात एकटीच अभ्यास करत असताना दोन दिवसांपूर्वी आरोपी तिच्या घरी गेला. त्यानंतर पीडितेला पिण्यासाठी पाणी मागितले. त्यानंतर वाचायला वृत्तपत्र मागितले. वृत्तपत्र आलमारीवर ठेवले असल्याने पीडिता ते काढण्यासाठी आळमारीजवळ गेली. ती बेसावध असल्याचे पाहून तिच्यासोबत असभ्य वर्तन केले.  पीडितेने त्याला धक्का दिला आणि हातातील वृत्तपत्र फेकून दिले. त्यानंतर तिने काचेची बाटली फोडून आरोपीला धाक दाखविला. संशयित आरोपीने बाटली हिसकावून घेतली. 

हेही वाचा - दंत महाविद्यालयात लागला बोर्ड : रुग्णांनो, ‘आमच्याकडे ना भूल देण्याचे औषध, ना सर्जिकल ब्लेड, ना...

पीडितेने आरडाओरड करताच घरातील फवारणीचे औषध पीडितेस पाजून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतर तिच्या हत्येचा प्रयत्नही केला. गंभीर अवस्थेत पीडितेला वरुडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने तिला अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी वरुड पोलिसांनी उद्धव नासरे या आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात अत्याचार, खुनाच्या प्रयत्नासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केल्याचे वरुडचे पोलीस निरीक्षक मगन मेहते यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: minor girl physical abused in warud of amravati