अमरावती : बुधवारी (ता. २६) याप्रकरणी पोलिसांनी संशयित गौतम नरेश चव्हाण (वय-२२) विरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पीडित मुलीचे आईवडील मोलमजुरी करतात. मुलगी लहान असल्यामुळे त्यांच्या सोबत होती..मंगळवारला काम आटोपल्यावर जाण्याकरिता विलंब झाल्यामुळे आईवडील व मुलीने उड्डाणपुलाखालीच रात्र काढण्याचे ठरविले होते. त्यामुळे रात्रीच्या सुमारास पीडिता आईवडिलांसोबत पुलाखाली झोपी गेली होती. त्याचवेळी संशयित गौतम चव्हाण हा त्याठिकाणी पोहोचला. त्याने तेथेच मुलीवर अत्याचार केला..पालकांना जाग आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पालकांनी आरडाओरड केल्यामुळे नागरिकांनी सदर घटनेची माहिती ११२ क्रमांकावर पोलिसांना दिली. संशयित गौतम चव्हाण हा घटनास्थळावरून पसार झाला..पीडित मुलीसह तिच्या पालकांना फ्रेजरपुरा ठाण्यात नेले. पीडित चिमुकलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्या आधारे पोलिसांनी अत्याचारासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला..प्रकरण गंभीर स्वरूपाचे असल्याने पोलिसांनी तातडीने दखल घेत गुन्हा दाखल करून संशयित गौतम चव्हाण याचा शोध सुरू केला आहे.- नीलेश करे, पोलिस निरीक्षक, अमरावती..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.