
नागपूर : अडचणींवर मात करीत शिक्षण घेतले. निर्धारपूर्वक ‘स्टाफ नर्स’ पदाची लेखी परीक्षा उत्तीर्ण केली. प्रतीक्ष होती मुलाखतीची. ‘अच्छे दिन’ येतील अशी आस हलाखीचे जीवन जगणारे कुटुंब लावून होते. आरोग्य उपसंचालक कार्यालयाने ई-मेल पाठवून तिला समुपदेशनासाठी दुसऱ्याच दिवशी सकाळी बोलविले. मात्र, नेमका मोबाईल बंद पडला. त्यामुळे हे पत्र बघताच आले नाही. हेच नियुक्ती पत्र होते. नियतीने डाव साधल्याने सारे दिव्य ओलांडूनही तिच्या पदरी निराशाच आली. या सावित्रीच्या लेकीला न्याय मिळावा, यासाठी आता अनेक संघटनांनी पुढाकार घेतला आहे.