Missing Child : अखेर चौथ्या दिवशी बेपत्ता नील मिळाला पोलिस व वनविभागाच्या चमूच्या शोधकार्याला यश
Tumsar News : चिखला येथील चार वर्षीय नील चौधरी अंगणात खेळताना अचानक १ जानेवारी रोजी बेपत्ता झाला होता. चार दिवसांच्या अथक शोधानंतर पोलिस व वनविभागाच्या टीमने नीलला सुरक्षितपणे शोधून काढले.
तुमसर : तालुक्यातील चिखला येथील बावनथडी कॉलनी येथील चार वर्षीय चिमुकला नील चौधरी (४) हा अंगणात खेळत असताना १ जानेवारी रोजी दुपारी चार वाजता अचानक बेपत्ता झाला.