Vidhan Sabha 2019 : निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडू 'या' पक्षाच्या संपर्कात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

'अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू हे शिवसेनेच्या संपर्कात आले आहेत. त्यांनी आज (ता.22) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे आणि बच्चू कडू यांच्या बराच वेळ चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

अचलपूर : 'अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू हे शिवसेनेच्या संपर्कात आले आहेत. त्यांनी आज (ता.22) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे आणि बच्चू कडू यांच्या बराच वेळ चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या भेटीवर स्पष्टीकरण देताना म्हटले की, माझा सध्या कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा विचार नाही. मी फक्त प्रहार या संघटनेच्या कामासंदर्भात चर्चा केली आहे. या भेटीवर अशा प्रकारचा खुलासा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपमध्ये इनकमिंग सरु असतानाच आमदार बच्चू कडू हे सुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत का? अशा चर्चांना उधाण आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA bacchu Kadu meets Shiv Sena Chief Uddhav Thackeray