
जळगाव जामोद, (बुलढाणा) - रविवारी नागपूर येथे राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार झाला. या मंत्रीमंडळात आमदार कुटे यांना मंत्रीपदापासून डावलण्यात आल्याने कार्यकर्त्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी सोशल मिडीयातून तर काहींनी जाहीरपणे रोष व्यक्त केला. तर आज असंख्य कार्यकर्त्यांनी नागपूरला जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याचे नियोजनसुद्धा केले होते. दरम्यान आमदार डॉ. संजय कुटे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची समजूत घालत संयम राखण्याचे आवाहन केले.