

Water Crisis Review: MLA Manoj Kayande Halts Transfer of Incomplete Schemes
Sakal
सिंदखेड राजा : सिंदखेड राजा तालुक्यातील विविध गावांमध्ये सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांची कामे तात्काळ सुरू करण्याच्या सुचना आ.मनोज कायंदे यांनी पाणी टंचाई आढावा बैठकीत दिल्या आहेत. तालुक्यातील पाणी टंचाई चा आढावा बैठक ता.२७ एप्रिल रोजी पंचायत समिती मधील जिजामाता सभागृहात आयोजन करण्यात आली होती.तालुक्यात सुरू असलेल्या विविध पाणीपुरवठा योजनांची कामे अद्याप पूर्ण न होता त्या योजना घाई घाईने ग्रामपंचायतीकडे हस्तांतरीत करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला त्यानंतर आ.कायंदे यांनी अपूर्ण कामे पूर्ण झाल्याशिवाय हस्तांतरण करू नये अशा सुचना प्रशासनाला दिल्या पुढे आ.मनोज कायंदे म्हणाले की,यंदा उन्हाळा जास्त असल्याने तालुक्यातील ८० ग्रामपंचायतीचा ग्रामपंचायत निहाय आढावा यांनी घेतला.