नागपूर : आमदार गजभिये यांच्या पत्नी पराभूत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

प्रभाग क्रमांक 13 मधून राष्ट्रवादीच्या त्या उमेदवार होत्या. त्यांच्या विरोधात भाजपच्या नगरसेविका वर्षा ठाकरे उभ्या होत्या.

नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांना मतदारांची चांगलाच धक्का दिला. त्यांच्या पत्नी सुजाता गजभिये महापालिकेच्या निवडणुकीत पराभूत झाल्या आहेत.

प्रभाग क्रमांक 13 मधून राष्ट्रवादीच्या त्या उमेदवार होत्या. त्यांच्या विरोधात भाजपच्या नगरसेविका वर्षा ठाकरे उभ्या होत्या. प्रकाश गजभिये यांची लोकप्रियता, जनसंपर्काच्या बळावर त्या सहज निवडून येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, सुजाता गजभिये यांना पराभूत करीत भाजपचे चारही उमेदवार विजयी झाले. आमदार गजभिये यांना जोरदार धक्का बसला आहे. 

स्वतः प्रकाश गजभिये यांनी याच परिसरातून विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. मात्र चारच्या प्रभागात आमदार गजभिये यांची लोकप्रतियता कामी आली नाही. भाजपचे या प्रभागाची संपूर्ण जबाबदारी आमदार परिणय फुके यांच्यावर सोपविली होती. फुके यांच्या पत्नी परिणिता फुके यासुद्धा रिंगणात होत्या. 
 

Web Title: mla prakash gajbhiye's wife defeated in nagpur