मी संजय कुटे शपथ घेतो की म्हणताच... 'जय गजानन' चा नामघोष!

पंजाबराव ठाकरे
रविवार, 16 जून 2019

राज्याच्या विस्तारित मंत्रिमंडळात जळगाव जा मतदारसंघाला इतिहासात प्रथमच मंत्रिपद मिळाले आहे. आमदार डाँ संजय कुटे  यांनी 16 जून रोजी कॅबिनेट च्या शपथविधी  साठी मंचावर प्रवेश करताच उपस्थित त्याच्या चाहत्यांनी राजभवन परिसरात राज्याचे आराध्य मानले जाणारे संत गजानन महाराज्यांच्या नावाचा जयघोष केला.

संग्रामपूर : जळगाव जा विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ संजय कुटे याचे नाव कॅबिनेट साठी जाहीर होताच राजभवन संत गजानन महाराज की जय चा जयघोषाने दुमदुमले.

राज्याच्या विस्तारित मंत्रिमंडळात जळगाव जा मतदारसंघाला इतिहासात प्रथमच मंत्रिपद मिळाले आहे. आमदार डाँ संजय कुटे  यांनी 16 जून रोजी कॅबिनेट च्या शपथविधी  साठी मंचावर प्रवेश करताच उपस्थित त्याच्या चाहत्यांनी राजभवन परिसरात राज्याचे आराध्य मानले जाणारे संत गजानन महाराज्यांच्या नावाचा जयघोष केला. इतकेच नाही तर मतदार संघात ही यावेळी फटाके फोडून  जल्लोष साजरा करण्यात आला.भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या तीन पंचवार्षिकपासून आमदार राहिलेले डॉ. संजय कुटे यांनी जिल्हाध्यक्ष ते प्रदेश सरचिटणीसपद सांभाळले आहे. त् राज्यातील जनतेच्या च्या समस्या सोडविण्यासाठी अभ्यासू व निर्णयक्षमता असलेल्या नेत्यामधील मंत्री म्हणून डॉ. कुटे नक्कीच नावारूपाला येतील.

गेल्या दीड ते दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात आमदार डॉ. संजय कुटे यांचे नाव येताच सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. जळगाव जामोद येथे फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली असून, चाहत्यांनी त्यांच्या घरी भेटी देऊन पेढे भरविले. आमदार डॉ. संजय कुटे प्रतिनिधित्व करत असलेल्या जळगाव जामोद मतदार संघात विदर्भ पंढरी शेगाव हे श्री संत गजानन महाराज यांच्या वास्तव्याने पुनीत झालेलं तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळेच आमदार कुटे यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच गजानन महाराज की जय असा नामघोष करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Sanjay Kute takes oath in Maharashtra cabinet