MLA Yashomati Thakur : राणा दाम्पत्यावर दाखल करणार १०० कोटींचा दावा - यशोमती ठाकूर

आमदार यशोमती ठाकूर : आरोप सिद्ध करण्याचे आव्हान
mla yashomati thakur will file defamation claim 100 crore against navneet rana ravi rana
mla yashomati thakur will file defamation claim 100 crore against navneet rana ravi ranaSakal

अमरावती : मागील अर्थात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मी राणा यांच्याकडून कडक नोटा घेऊन विरोधकांचा प्रचार केला, असा खोटा व बिनबुडाचा आरोप करणाऱ्या रवी राणा यांनी हा आरोप सिद्ध करावा, अन्यथा त्यांच्या विरोधात आपण १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याची माहिती आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

या दाम्पत्याने संपूर्ण जिल्ह्याचे वातावरण दूषित करण्याचे काम केले आहे, असा आरोप करीत अ‍ॅड. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, मी लोकसभा निवडणुकीत त्यांच्याकडून कडक नोटा घेतल्या आणि दुसऱ्याचा प्रचार केला, हे त्यांनी सिद्ध करावे.

त्यांनी केलेला आरोप हा क्रिमिनल ऑफेन्स आहे. त्यामुळे मी तशी तक्रारसुद्धा करणार आहे. निवडणुकीत अशा नोटा वाटत असतील तर ईडी कुठे गेली? उपमुख्यमंत्र्यांना हे काही दिसत नाही काय? असा सवाल त्यांनी केला.

mla yashomati thakur will file defamation claim 100 crore against navneet rana ravi rana
Ravi Rana vs BJP : रवी राणा आणि भाजपात वाजलं, पदाधिकाऱ्यांनी नामफलकांना फासलं काळं

खोटे व बिनबुडाचे आरोप करण्यापूर्वी त्यांचा नेमका पक्ष कोणता? हे त्यांनी जाहीर करावे. कॅमेरापुढे खोटा अभिनय करणाऱ्या व्यक्तीकडून काय अपेक्षा करणार? असा सवाल करून त्या म्हणाल्या, जातप्रमाणपत्र खरं की खोटं, हा खटला न्यायालयात प्रलंबित असताना व निवडणुकीत जास्त खर्च केल्याचे प्रकरण निवडणूक आयोगाकडे सुरू असताना त्यांना नेमका आशीर्वाद कुणाचा?

भाजप त्यांना का पाठीशी घालत आहे, असा प्रश्नही यशोमती ठाकूर यांनी केला. त्यांच्या मतदारसंघात जाऊन आपण खरं बोललो हा घाव राणा दाम्पत्याच्या जिव्हारी लागला. म्हणूनच हा राजकीय पोटशूळ उठला आहे.

mla yashomati thakur will file defamation claim 100 crore against navneet rana ravi rana
Navneet Rana Threaten Call: खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांकडून चौकशी सुरू

म्हणूनच ते अशी घाणेरडी गरळ ओकत आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली. दरम्यान, या मुद्यावर आमदार रवी राणा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. युवा स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांनी समाजमाध्यमांवरून एक व्हिडिओ व्हायरल केला असून त्यात अशी नोटीस अद्याप मिळाली नाही, ती मिळाल्यावर आम्ही कायदेशीर माध्यमातून उत्तर देऊ, असे त्यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com