Raj Thackeray : तरुणांना आठवले बाळासाहेब; राज ठाकरेंना पाहताच गर्दीतून आवाज आला... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray
Raj Thackeray : तरुणांना आठवले बाळासाहेब; राज ठाकरेंना पाहताच गर्दीतून आवाज आला...

Raj Thackeray : तरुणांना आठवले बाळासाहेब; राज ठाकरेंना पाहताच गर्दीतून आवाज आला...

राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. भाजपा नेत्यांच्या गाठीभेटी, त्यांच्याकडून मिळणारे गिफ्ट्स, समर्थकांचा, चाहत्यांचा मिळणारा प्रतिसाद या सगळ्यामुळे त्यांचा हा दौरा चर्चेत आहे. अशातच आता मनसेकडून विदर्भातला एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. विदर्भातल्या तरुणांना बाळासाहेबांची आठवण आल्याचं या व्हिडीओतून दिसत आहे.

हेही वाचा: Raj Thackeray : 'शिवतीर्था'वर घुमणार PM मोदींचा आवाज; राज ठाकरेंना भाजपाकडून विशेष भेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. यामध्ये राज ठाकरेंच्या गाडीभोवती तुफान गर्दी झाली आहे. या गर्दीमधून हा व्हिडीओ शूट करण्यात आल्याचं दिसत आहे. कॅमेऱ्याच्या मागे असलेल्या काही तरुणांचा आवाज या व्हिडीओमध्ये येत आहे. राज ठाकरेंना पाहून हे तरुण म्हणतायत, " एकदम बाळासाहेब ठाकरेंसारखे दिसतायत रे. गाडीपण बघ ना तशीच आहे." याबरोबर हे तरुण राज ठाकरेंना पाहताच जल्लोष करतानाही दिसत आहेत.

हेही वाचा: Raj Thackeray: तपासणीसाठी आलेल्या पोलिसांच्या श्वानाचे राज ठाकरेंनी पुरवले लाड; व्हिडीओ व्हायरल

राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याची राज्यभर चर्चा सुरू आहे. राज ठाकरेंना या विदर्भ दौऱ्यामध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी एक भेट दिली आहे. तिरंग्याची प्रतिमा असलेल्या या सन्मानचिन्हामधून पंतप्रधान मोदींचं एक रेकॉर्डेड भाषण ऐकू येतं. या भेटीचीही आता चर्चा सुरू आहे. राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर ट्रेनने गेले. या ट्रेनमधला एक व्हिडीओ व्हायरल होत होता. यामध्ये ते तपासणीसाठी आलेल्या पोलिसांच्या कुत्र्याचे लाड पुरवताना दिसले. तसंच त्यांनी या कुत्र्याची चौकशीही केली.

Web Title: Mns Leader Sandeep Deshpande Shared A Video About Raj Thackeray Vidarbha Visit

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..