Car set on fire
sakal
मोताळा - मलकापूर मधून एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे कारमध्ये अपहरण करून निघालेल्या तिघांना नागरिकांनी सिनेस्टाईल पाठलाग करून मोताळानजीक पकडले. यावेळी संतप्त जमाव तिघांवर तुटून पडला असताना, पो.काँ. गणेश सुर्यवंशी व पो.हे.काँ. अमोल खराडे यांनी हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे. मात्र संतप्त जमावाने अपहरणकर्त्यांची कार पेटवून दिली आहे.