अल्पवयीन मुलीचा विनयभंग; पाच दिवसांनंतर गुन्हा

२३ वर्षीय युवकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार
crime
crimesakal

तिवसा : २३ वर्षीय युवकाने गावातच राहणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेडछाड करत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील कुऱ्हा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पोस्को कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दिवसेंदिवस महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढत आहे. महिला तसेच अल्पवयीन मुलीवर देखील अत्याचार झाल्याच्या तक्रारी समोर येत आहे. स्मार्टफोन व सोशल मीडियाच्या अधिक तर वापरामुळे आज तरुण युवक वाईट मार्गावर जात आहे. अशातूनच मग मुलींचे छेडछाडीचे प्रकरण समोर येतात. दिनांक १ एप्रिल रोजी तालुक्यातील कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका लहानशा गावात नवव्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीची रस्त्यावर अडवणूक करत छेडछाड करून विनयभंग केल्याचा प्रकार काल रात्री उशिरा उघडकीस आला.

प्राप्त माहितीनुसार, नेहमीप्रमाणे मुलगी शाळेतून आपल्या सायकलने घरी जात असताना सायकलची चैन पडल्याने ती एका झाडाखाली बसून चैन लावत असताना दुचाकीने येत असलेल्या गावातील सुरज किशोर ठाकरे याने तिला उचलून धरतं वाईट पद्धतीने तिला स्पर्श करत रस्त्यावर तिचा विनयभंग केला. घरी येताच तिने घडलेला सर्व प्रकार आईकडे सांगितला.

मात्र, बदनामी व भीती पोटी हा प्रकार कुणाकडे सांगावा या चिंतेने काल हिम्मत करून रात्री उशिरा 10वाजता सर्व आपबीत पोलीसांन समोर मुलीने सांगितली यावरून कुऱ्हा पोलिसांनी आरोपी सुरज किशोर ठाकरे वय 23 वर्ष विरुद्ध 354 व पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी सुरजला आज सकाळी पोलीसांनी अटक केली आहे तर पुढील तपास ठाणेदार संदीप बिरांजे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे..

पाच दिवसांनंतर गुन्हा

पीडित मुलीला वडिल नसून घरात आई, एक लहान बहीण व आजी आहे, पुरुष म्हणून कुणीच नसल्याचा फायदा घेत गावातील काही लोकांनी हे प्रकरण पोलिसांपर्यंत जाऊ नये यासाठी पीडित मुलीच्या आईवर दबाव टाकात तक्रार न देण्याचा दम दिल्याची चर्चा गावात आहे. त्यामुळेच की काय पोलिसांनी पाच दिवसानंतर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असावा असे ही बोले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com