esakal | इंग्लंडमध्ये फसलेली रक्‍कम मिळाली परत
sakal

बोलून बातमी शोधा

इंग्लंडमध्ये फसलेली रक्‍कम मिळाली परत

इंग्लंडमध्ये फसलेली रक्‍कम मिळाली परत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
नागपूर : इंग्लंडमधील एका ठगबाजाने नागपुरातील पेपर व्यापाऱ्याची सहा लाखांनी फसवणूक केली होती. मात्र, "सायबर एक्‍स्पर्ट'च्या प्रयत्नाने फसगत झालेली सर्व रक्‍कम परत मिळाली. देशभरातूनच नव्हे तर जगातील कोण्याही कानाकोपऱ्यातून हॅकर्स आणि ठगबाजाने ऑनलाईन उडवलेली रक्‍कम परत मिळविता येते, अशी माहिती सायबर क्राईम एक्‍स्पर्ट ऍड. महेंद्र लिमये यांनी आज आयोजित पत्रपरिषदेत दिली.
नागपुरातील पेपर व्यावसायिक दिलीप सिंघी यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये इंग्लंडमधील मिडलटन पेपर्स कंपनीशी पेपर खरेदीचा ऑनलाईन करार केला. करारानुसार अर्धी रक्‍कम म्हणजे 9 हजार 620 डॉलर्स (सहा लाख रूपये) त्यांनी कंपनीच्या एजेंटने सांगितलेल्या खात्यात भरली. ऑनलाईन कागदपत्रांची तपासणी झाली आणि माल एका महिन्यात पाठवित असल्याची बोलणी झाली. मात्र, दोन महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही माल भारतात आला नाही. त्यामुळे सिंघी यांनी चौकशी केली. दरम्यान, एजेंटने पुन्हा 20 टक्‍के रक्‍कम खात्यात भरण्यास सांगितले. सिंघी यांना संशय आल्याने त्यांनी इंग्लंडमधील इर्विन शहरात असलेल्या नातेवाईकांना चौकशी करण्यास सांगितले. कुणीतरी बोगस नावाने कंपनी काढून फसवणूक केल्याचे लक्षात आले. त्यांनी सायबर कायदा तज्ञ ऍड. महेंद्र लिमये यांना प्रकरण सांगितले. त्यांनी लगेच बॅंक ऑफ स्कॉटलॅंड येथील अधिकाऱ्यांशी ई-मेलने संपर्क करून फसवणूकीची माहिती दिली. नागपूरमधील एक्‍सिस बॅंकेच्या अधिकाऱ्यांनीही मदत केली.
loading image
go to top