Monsoon Update 2025 : मॉन्सूनची आगेकूच; विदर्भात दाखल, ४५ वर्षांत पहिल्यांदाच मे महिन्यात आगमन
Vidarbha Monsoon : गडचिरोलीमार्गे विदर्भात आज मॉन्सून दाखल झाला असून, तब्बल ४५ वर्षांनंतर मे महिन्यात मॉन्सूनने विदर्भात हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाटासह पडलेल्या जोरदार पावसामुळे शहरातही मॉन्सूनचे स्वागत झाले.
नागपूर : विदर्भातील बळिराजा ज्या क्षणाची चातकाप्रमाणे वाट पाहात होता त्या नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सूनचे आज, बुधवारी विदर्भात अधिकृत ‘एन्ट्री’ केली. मॉन्सून गडचिरोलीमार्गे विदर्भात दाखल झाल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभागाने दिली आहे.