
नागपूर : नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सूनच्या अगमनाला पोषक वातावरण असून, येत्या एक-दोन दिवसांत अंदमानात दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोणत्याही अडथळ्यांविना मॉन्सूनची प्रगती पुढेही कायम राहिल्यास केरळ आणि त्यानंतर महाराष्ट्रातही यंदा लवकर आगमन अपेक्षित आहे. विदर्भात गतवर्षीप्रमाणे मॉन्सूनची एन्ट्री होण्याची शक्यता आहे.