Monsoon Set to Enter Vidarbha Soon
esakal
मॉन्सूनने अनपेक्षितपणे पुढे आगेकूच केली असून, तो विदर्भाच्या दारावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी चंद्रपूरमार्गे मॉन्सूनचे विदर्भात आगमन होऊ शकते, अशी माहिती हवामान अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी ‘सकाळ’ला दिली. त्याचवेळी चंद्रपूर व नागपुरात सोमवारी बरसलेला पाऊस मॉन्सूनपूर्वच असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.