विदर्भात आठवडाभर पावसाचा मुक्काम?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

अमरावती : विदर्भात 5 सप्टेंबरपर्यंत कमी-अधिक प्रमाणात पावसाचा मुक्काम राहणार आहे. बंगालच्या उपसागरावर उद्या, गुरुवारी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे विदर्भात पावसाचे प्रमाण वाढेल. 2 सप्टेंबरला पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्‍यता असल्याने 5 सप्टेंबरपर्यंत विदर्भात कमी-जास्त प्रमाणात पावसाची हजेरी राहील.

29 ते 31 ऑगस्टपर्यंत विदर्भात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, तर एक व दोन सप्टेंबरला काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामानशास्त्र विभागप्रमुख प्रा. अनिल बंड यांनी वर्तविला. पावसाळ्याच्या अखेरच्या महिन्याला सुरुवात होणार आहे. मात्र जिल्ह्यात काही निवडक भाग वगळल्यास अद्याप पाहिजे तसे पर्जन्यमान झालेले नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: monsoon may active in vidarbha for a week