Vidarbha Monsoon Update : विदर्भात पावसाचा जोर वाढणार, चार दिवस यलो व ऑरेंज अलर्ट, कसे असेल हवामान?
Yellow and Orange Alert for Vidarbha : विदर्भात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. नागपूरसह अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. निसर्गाने उष्म्याने त्रस्त वैदर्भीयांना दिलासा दिला असून, पावसामुळे शेतीसुद्धा वाचण्याची आशा निर्माण झाली आहे.
नागपूर : तब्बल दहा दिवसांपासून गायब असलेला मॉन्सून पुन्हा एकदा विदर्भात सक्रीय झाला आहे. बंगालच्या उपसागरात नव्याने तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील तीन-चार दिवस नागपूरसह संपूर्ण विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.