Tipper Accident : हिंगणा मार्गावर टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
Hingna Road Accident : हिंगण्यातील वानाडोंगरी येथे मार्गावर दुकानाकडे निघालेल्या मोपेडस्वाराचा टिप्परच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. रस्त्याच्या कडेला अतिक्रमण आणि अरुंद रस्ता यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे.
हिंगणा : मार्गावर दुकानाकडे निघालेल्या मोपेडस्वार मालकाचा टिप्परच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (ता.३) सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास वानाडोंगरी येथील वैभवनगर टर्निंगजवळ घडला.