

Akola
esakal
अकोला: मोर्णा आणि विहुपा नदीच्या पूररेषा (लाल व निळी रेषा) निश्चितीचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वाद आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आयआयटी मुंबई यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि 'डेम डेटा'च्या आधारे तयार केलेले नवीन पूररेषा नकाशे अंतिम करून शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आल्याची माहिती आहे.मोर्णा व विहुपा नदीच्या पूररेषा निश्चितीबाबत यापूर्वी करण्यात आलेल्या सर्वेक्षणावर मोठ्या प्रमाणात आक्षेप घेण्यात आले होते.