
मोताळा (जि.बुलडाणा) : तेलंगणा राज्यातील रायपर्थी येथील एसबीआय बँक दरोडा प्रकरणाचे मोताळा कनेक्शन समोर आले आहे.१४ कोटी रुपयांच्या या दरोडा प्रकरणात सात जणांच्या टोळीमधील दोन जण मोताळ्याचे असल्याचे उघडकीस आले आहे. तेलंगणा पोलिसांनी या टोळीतील तिघांच्या मुसक्या आवळल्या असून, एक आरोपी मोताळा शहरातील आहे.