
Uncontrolled Eco Car Breaks Railings, Injures Five in Motala
Sakal
मोताळा : इको कार अनियंत्रित होऊन पुलाचे सुरक्षा कठडे तोडून नाल्यात कोसळल्याची घटना मोताळा येथील आयटीआय कॉलेजनजीक मंगळवारी (ता. २१) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर बुलडाणा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.