Vidarbha News: पाणीपुरवठा योजनेचे वीज कनेक्शन कट; लाखों रुपयांचे वीजबिल थकीत; भर उन्हाळ्यात ग्रामीण नागरिकांचे होतोय हाल

Electricity Cut Hits Mothala Water Supply: मोताळा शहरातील पाणीपुरवठा योजनेचे लाखो रुपयांचे वीजबिल थकीत असल्याने वीज कट. भर उन्हाळ्यात ग्रामीण नागरिकांचे हाल.
Vidarbha News

Vidarbha News

esakal

Updated on

मोताळा: नळगंगा धरणात पुरेसा जलसाठा असतानाही आता नागरिक तहानलेले राहतात कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणी पुरवठा योजनेचे लाखो रुपयांचे वीजबिल थकीत असल्याने वीज वितरण कंपनीने या योजनेची वीज कट केली आहे. भर उन्हाळ्यात ग्रामीण नागरिकांचे हाल होत आहे.

मोताळा शहरासाठी मंजूर झालेल्या ३८ कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना प्रगती पथावर असून लवकरच ही यीजना पूर्णत्वास जाणार आहे. त्यामुळे आता लवकरच शहराला स्वच्छ पाणीपुरवठा होणार आहे. आउटडेटेड झालेली मोताळा शहराची पाणीपुरवठा योजना नव्याने मंजूर झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com