esakal | 'त्या' मातेचा जीव एकदाही तळमळला नसावा का? पोटच्या गोळ्याचा ब्लेडनं चिरला गळा
sakal

बोलून बातमी शोधा

child hand

'त्या' मातेचा जीव एकदाही तळमळला नसावा का? पोटच्या गोळ्याचा ब्लेडनं चिरला गळा

sakal_logo
By
Team eSakal

पुसद (जि. यवतमाळ) : पती-पत्नीचे खटके उडाल्यानंतर 22 वर्षीय विवाहित महिलेने सव्वा वर्षाच्या चिमुकल्याचा ब्लेडने गळा कापून स्वतः घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पुसद तालुक्‍यातील उडदी येथे मंगळवारी (ता.13) भल्या पहाटे उघडकीस आली.

या घटनेची माहिती गावच्या उडदी गावच्या पोलिस पाटलांनी पुसद ग्रामीण पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तेव्हा महिलेने ज्या खोलीत फाशी घेतली त्या खोलीचे दोन्ही दारे आतून बंद होती. घरावरील टिनपत्रे काढून आत प्रवेश केल्यानंतर महिला फास लावलेल्या स्थितीत आढळून आली. तर चिमुकले बाळ रक्ताच्या थारोळ्यात अंथरुणावर पडून होते.

आता कोव्हिड बेडची माहिती मिळणार एका ‘क्लिक'वर; स्मार्ट सिटीने तयार केलं सॉफ्टवेअर

मृत महिलेचा पती ज्ञानेश्वर, त्याचे वडील व आई हे घराच्या अंगणात झोपलेले होते. पती-पत्नीचे खटके उडत असल्याने पत्नीला माहेरी पोहचून देण्याचे ठरले असतानाच रात्री ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळाल्याचे ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मोतीराम बोडखे यांनी सांगितले.या घटनेमुळे खळबळ माजली असून ग्रामीण पोलिसांनी मृत स्वाती ज्ञानेश्वर लोहकरे विरुद्ध आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. मृत मुलाचे नाव वीर आहे.

दरम्यान मृतकचे वडील आनंदा नाथबा जाधव (रा. गुळभेली, ता. मोताळा, जि. बुलडाणा) यांनी आपल्या नातवाची जावई ज्ञानेश्वर लोहकरे व सासू-सासऱ्यांनी धारदार ब्लेडने गळा चिरून हत्या केली व मुलीला गळफास देऊन खून करण्यात आला, अशी तक्रार ग्रामीण पोलिसात दाखल केली. मात्र सुरुवातीला ही तक्रार घेण्यास पोलिसांनी नकार दिला, असा आरोप आनंदा जाधव व आई आशा जाधव यांनी केल्याने या प्रकरणात संशय निर्माण झाला.

संपादन - अथर्व महांकाळ