मातेच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन बाळाला विकण्याचा प्रयत्न, चाइल्ड लाईनने घडवली भेट

The mother got her baby because of the child line
The mother got her baby because of the child line

नागपूर : ती सहा महिन्यांची गर्भवती... दारुड्या पतीचा जाच असह्य झाल्याने त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली... परंतु त्याने कसलाही विचार न करता घरातून हाकलून दिले... बुटीबोरीतील भल्या महिलेने तिच्या खानावळीत आश्रय दिला... प्रसूतीनंतर पुनर्जन्म आश्रम गाठले... परंतु आश्रमातील पदाधिकाऱ्यांनी चक्क तिच्या बाळालाच विकण्याचा प्रयत्न केला... अखेर चाइल्ड लाईनच्या मदतीने आई-बाळाची भेट झाली.


निराधार महिलेचा फायदा घेत संस्था चालकांनी तिच्या बाळाला विकाल्याबाबत चाइल्ड लाईन वर्धा यांना तक्रार प्राप्त झाली. त्यांनी महिलेची भेट घेऊन प्रकरण जाणून घेतले. या महिलेचे हैदराबाद येथे नरेश चिकटे यांच्याशी लग्न झाले. तिथे रोजमजुरी ते उदरनिर्वाह करायचे. कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन झाल्याने नरेशने तिला तुरकमारी बुट्टीबोरी येथे त्याच्या घरी आणले.

पतीला दारूचे व्यसन असल्याने रोज दारू पिऊन तिला मारहाण करायचा. सततच्या त्रासाला कंटाळून महिलेने बुटीबोरी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यामुळे पतीने तिला घराबाहेर काढले. त्यावेळी ती सहा महिन्यांची गर्भवती होती. बुटीबोरी येथील एका महिलेने तिला तिच्या भोजनालयात आश्रय दिला. प्रसूती होतपर्यंत तिची काळजी घेतली.

प्रसूती झाल्यावर तिचा परिचय प्रयाग डोंगरे नामक व्यक्तीशी झाला. त्याचे आश्रम असल्याचे तो सांगू लागला त्यावरून ती त्याच्या सोबत गेली व पुनर्जन्म आश्रमामध्ये राहू लागली. दोन महिन्यांनी आधार कार्ड काढायच्या नावाने डोंगरे तिला नागपूरला घेऊन गेला व एका दापत्यास तिचे बाळ दत्तक देण्याबद्दलचे बेकादेशीर दत्तक पत्र तयार करून घेतले. याबाबत माहिती मिळताच चाइल्ड लाईन वर्धा यांनी बालकल्याण समिती वर्धा आणि याच्या समोर सदर महिलेले हजर करण्यात आले.

समितीला तिची आपबीती सांगण्यात आली. समितीने तातडीने बैठक घेऊन नागपूर बाल ल्याण समिती यांना पत्र दिले. चाइल्ड लाईन वर्धाला संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. नागपूर बालकल्याण समिती, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अपर्णा कोल्हे यांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांना सदर प्रकरणात चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले.


जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण, व चाइल्ड लाईन वर्धा प्रतिनिधी आशिष मोडक यांच्या चमूने बुट्टीबोरी पोलिस स्टेशन येथे संबंधित व्यक्तीवर गुन्हा नोंदवून महिलेला तिचे बाळ मिळवून दिले. साथ फाउंडेशन बुट्टीबोरी संस्थेच्या अध्यक्ष प्रयाग डोंगरे याने पीडित महिलेचा फायदा घेत दबाव टाकून तिचे बाळ बेकायदेशीररीत्या दत्तक दिले त्यात पैशाचा व्यवहार केल्याचे पीडित महिलेने सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com