

Amravati Kidney Donation
esakal
अचलपूर: रक्ताच्या नात्यांपलीकडे जाऊन मानवतेचा अनोखा आदर्श घालून देणारी घटना अमरावती येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात घडली. अचलपूर तालुक्यातील पारडी येथील किडनी विकाराने त्रस्त ४० वर्षीय देवानंद किसन चव्हाण यांना त्यांच्या सासू रंजना श्रीराम सोळंके (वय ५५) यांनी स्वतःची किडनी दान करून नवजीवन दिले.