
अकोला ः आई होणे ही प्रत्येक स्त्रीसाठी भावनिक गोष्ट असते. ज्या क्षणाला तुम्हाला तुम्ही ‘आई’ होणार आहात हे समजते तो क्षण तुमच्यासाठी काळजाचा ठोका चुकवणारा असतो. कोणत्याही स्त्रीसाठी प्रेगन्सीचा काळ हा खासच असतो. एक नवा जीव आपल्यातून निर्माण होणार आहे ही भावनाच वेगळी असते. मात्र, सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढविला आहे. या काळात गरोदर मातांनी डॉक्टरांनी सुचवलेल्या सहज-साध्या टीप्स फॉलो करून आपल्यासह बाळाच्याही आरोग्याची काळजी घेणे गरजेचे झाले आहे.
शारीरिक हालचाल
सुखरूप गरोदरपण आणि सुलभ प्रसूतीसाठी गरोदरपणी आवश्यक शारीरिक हालचाल करणे फार महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्ही गरोदर आहात आजारी नाही हे नेहमी लक्षात ठेवा. उगाचच सतत पडून राहणे अथवा कोणतीच कामे न करणे यामुळे बाळाच्या जन्माच्या वेळी प्रॉब्लेम होऊ शकतो.
व्यायाम
जर तुमचे आणि बाळाचे आरोग्य ठणठणीत असेल तर तुम्ही गरोदरपणी हलके व्यायाम नक्कीच करू शकता. तज्ज्ञांच्या मदतीने योगासने आणि प्राणायम केल्यामुळे तुमचा प्रसूती काळ सुलभ होऊ शकतो. दिवसभरात तीस मिनीटे निरोगी आयुष्यासाठी जरूर द्या.
सकाळचा नास्ता चुकवू नका
मॉर्निंग सिकनेसमुळे अनेक गरोदर महिला सकाळी नास्ता करणे टाळतात. मात्र हे चुकीचेआहे कारण आता तुम्हाला तुमच्या बाळाच्या आरोग्याचीदेखील काळजी घ्यायची आहे. मॉर्निंग सिकनेस टाळण्यासाठी सकाळच्या नास्त्यामध्ये दूध, रस असे द्रवपदार्थ न घेता पोहे, पोळी, पराठा असे पदार्थ खा.
आरामदायक कपडे
प्रेगन्सीमध्ये तुमचे वजन आणि पोटाचा घेर वाढत जातो. त्यामुळे या काळात खास मॅर्टनिटी ड्रेस वापरणे सोयीचे ठरू शकेल. शिवाय गरोदरपणात घट्ट कपडे घातल्यामुळे तुमच्या रक्तदाब आणि श्वसनक्रियेवर चुकीचा परिणाम होऊ शकतो. तुम्ही निवडलेले कपडे सुती असतील याची काळजी घ्या. कारण त्यामुळे तुम्हाला गरम होणार नाही.
पुरेसा आराम करा
गरोदरपण हे आजारपण नसले तरी या काळात पुरेसा आराम करणे गरजेचे आहे. कारण गरोदरपणात तुमच्या शरीरात अनेक बदल होत असतात. या बदलांना सामोरे जाण्यासाठी तुम्हाला शारीरिक आरामाची गरज असू शकते. शिवाय या काळात अती दगदग झाल्यास आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. जर डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला असेल तर पुरेशी बेड रेस्ट जरूर घ्या. रात्री आठ तास आणि दिवसा दोन तास झोप घ्या, शक्यतोवर डाव्या कुशीवर झोपा.
भरपूर पाणी प्या
सध्या उन्हाळ्याच्या दिवसांत शरिरातील पाणी कमी होते. गरोदर महिलांनी सतत पाणी प्यावे जेणे करून गर्भाच्या अवती-भोवतीचे पाणी कमी होणार नाही. व्हिटामीन, सी, अ, सत्व युक्त फळे खावे, लोहयुक्त गोळ्यासोबतच व्हिटामीन डी कॅल्शीअम गोळ्या सुरू ठेवाव्यात.
सध्या लॉकडाउनच्या काळात गरोदर मातांनी स्वतःची काळजी घ्यावी, कुटुंबीयांनी अत्यावश्यक वेळेसाठी वाहन पाहून ठेवावे, खबरदारी म्हणून डॉक्टरांशी फोनवरून सल्ला घ्यावा, अत्यावश्यक वेळी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करावी.
--डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षिका, अकोला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.