Video : खासदार नवनीत कौर राणा यांनी धरला दांडियावर ताल...

अरुण जोशी
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी सहभाग घेऊन दांडियाचा मनसोक्त आनंद घेत दांडियावर ताल धरला. या मध्ये अनेक महिलांनी सहभाग घेतला होता. त्यात खासदार नवनीत राणा यांनी महिलांना प्रोत्साहित केले. सर्वजण नवनीत यांचा डान्स बघून थक्क झाले.  

अमरावती : नवरात्री महोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना या नवरात्री महोत्सवात गरबा, दांडियाची मोठी धूम असते. यासाठी महिलांना प्रशिक्षण सुद्धा दिले जाते. असेच प्रशिक्षण अमरावती येथील प्राइम पार्क लॉरेन येथे महिलांनी आयोजित केले होते. या प्रशिक्षणात अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी सहभाग घेऊन दांडियाचा मनसोक्त आनंद घेत दांडियावर ताल धरला. या मध्ये अनेक महिलांनी सहभाग घेतला होता. त्यात खासदार नवनीत राणा यांनी महिलांना प्रोत्साहित केले. सर्वजण नवनीत यांचा डान्स बघून थक्क झाले.  

अमरावती शहरात नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो व या उत्सवादरम्यान शहरातील 40 ते 50 ठिकाणी दांडिया खेळल्या जातात. या सर्व ठिकाणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या सहभागी होऊन दांडिया खेळतात नवनीत राणा या गेल्या पाच वर्षापासून प्रत्येक मंडळात सहभागी होतात. हे विशेष या वर्षीचा दांडिया मध्ये आता खासदार नवनीत राणा या भाग घेणार असून सर्व मंडळे नवरात्र उत्सवाच्या तयारीला जोमाने लागले आहेत. तर नवनीत राणा या सुद्धा सराव करण्यात मग्न आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Navneet Kaur Rana plays dandaiya at Aamravati