ठाकरे सरकार विरोधात बोलणाऱ्यांवर गुन्हे दाखल होतात - नवनीत राणा

शाईफेक करतेवेळी रवी राणा हे अमरावतीत नव्हते असा दावा त्यांनी केला आहे.
नवनीत राणा
नवनीत राणाइसकाळ
Summary

शाईफेक करतेवेळी रवी राणा हे अमरावतीत नव्हते असा दावा त्यांनी केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रकरणावरून अमरावती महानगर पालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली. (Municipal Commissioner of Amravati) या प्रकारनंतर अमरावतीत हा वाद चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणात आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यासह १० जणांवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. यावर माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नसून मला यात जाणीवपुर्वक अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचं आरोप त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केला होता. आता यानंतर नवनित राणा (navneet rana) यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

नवनीत राणा
'शाईफेक घटनेच समर्थन करत नाही, माझा याच्याशी संबंध नाही'

त्या म्हणाल्या, शाईफेक करतेवेळी रवी राणा (ravi rana) हे अमरावतीत नव्हते असा दावा त्यांनी केला आहे. यावेळी राणा यांनी महाराष्ट्र सरकावर रोष व्यक्त केला आहे. यावेळी त्या म्हणाल्या, ज्या वेळी घटना घडली त्यावेळी रवी राणा हे विमानप्रवास करत होते. मात्र रात्री मुख्यमंत्री कार्यालयातुन आदेश आल्यावर त्यांच्यावर कलम ३०७ नूसार गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला. महाराष्ट्र सरकार चुकीचं वागत अशी भावना खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत भाषणातून व्यक्त केली.

ठाकरे सरकार विरोधात जे बोलणार त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात, अशी तिखट प्रतिक्रिया देत त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात संविधानाची हत्या केली जात आहे असा गंभीर आरोपही त्यांनी केला. दरम्यान, आयुक्तांवर जी शाईफेक झाली त्या घटनेचं मी समर्थन करत नाही, त्या घटनेशी माझा काहीही संबंध नाही. सुडबुद्धीने माझे नाव या प्रकरणात टाकण्यात आले असल्याचा आरोप आमदार राणा यांनी यावेळी केले आहेत.

नवनीत राणा
हिजाब प्रकरणावर सुनावणी घेण्यास SC चा नकार, सरन्यायाधीश म्हणाले...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com