(Video) बापरे...! खासदार उतरले गुंडागर्दीवर, सेनेच्या पदाधिकाऱ्यावर हाणणार होते गोटा, वाचा संपूर्ण प्रकार

शेख सत्तार
रविवार, 2 ऑगस्ट 2020

खासदार रामदास तडस घटनास्थळी पोहोचताच त्यांच्यात आणि अशोक काकडे यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. यावेळी खासदारांना पोलिस पकडून होते तर काकडे नालीत उभे होते. याचे व्हिडिओ चित्रीकरण अनेकांनी केले.

देवळी (जि. वर्धा) : देवळी नगरपरिषदेतर्फे जीवन प्राधिकारणच्या पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन टाकण्यात येत आहे. ही पाइपलाइन टाकताना नाली आपल्या जागेतून होत असल्याचा आरोप करीत शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अशोक काकडे यांनी काम बंद पाडले. याची माहिती खासदार रामदास तडस यांना होताच ते आक्रमक झाले आणि काकडे यांच्यासोबत बाचाबाची झाली आणि पुढील प्रकार घडला.

खासदार रामदास तडस घटनास्थळी पोहोचताच त्यांच्यात आणि अशोक काकडे यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. यावेळी खासदारांना पोलिस पकडून होते तर काकडे नालीत उभे होते. याचे व्हिडिओ चित्रीकरण अनेकांनी केले. पोलिसांच्या उपस्थित झालेल्या प्रकारात दोन्ही पक्षांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात आली. शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी अशोक काकडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून खासदार रामदास तडस यांच्या विरोधात तर पालिकेने दिलेल्या तक्रारीवरून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी अशोक काकडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्लिक करा -  नागपुरात डबल मर्डरचा थरार! पत्नीच्या अनैतिक संबंधावरून झाला वाद.. अखेर त्याने हाती घेतली कुऱ्हाड आणि...
 

वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत 34 कोटी रुपयांच्या योजनेचे काम पालिकेच्या निर्देशाने जीवन प्राधिकरण करीत आहे. अंदोरी येथील ही पाइपलाइन टाकून इंदिरानगर परिसरात नेण्यात येत आहे. या योजनेचे सर्वच काम नियमानुसार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. तर नागरिकांकरिता ही योजना महत्त्वाची असल्याने त्यात आडकाठी करणे योग्य नसल्याचे खासदार रामदास तडस यांचे म्हणणे आहे.
 

विकासकामांत अडथळा आणू नये
ही जागा काकडे यांची नाही. जागेचा मालकी हक्‍क त्यांनी न्यायालयातून सिद्ध करावा. विनाकारण विकासकामांत अडथळा आणू नये. जनतेला पाण्याची अडचण होत असल्याने ही योजना तत्काळ पूर्णत्त्वास नेणे आवश्‍यक आहे. यात आडकाठी झाल्याने आक्रमक व्हावे लागले.
- रामदास तडस, खासदार वर्धा
 

 

शेतजमीन माझ्याच मालकीची : अशोक काकडे

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अशोक काकडे यांनी ते शेत आपल्याच मालकीचे असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. नगरपालिकेने माझ्या जागेवर रस्ता आणि पाइपलाइन टाकली. जागेबाबत माझे आणि शासनाचे भांडण आहे. खासदार रामदास तडस यांनी यात पडायला नको होते. जमीन मिळविण्यासाठी आपण न्यायालयाची प्रक्रिया पार पाडणार असल्याचेही श्री. काकडे म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Ramdas Tadas angry to Shiv Sena Incumbent