esakal | खासदार तडस यांच्या कौटुंबिक वादात मोठा ट्विस्ट, मुलगा-सुनेचं वैदीक पद्धतीनं लग्न
sakal

बोलून बातमी शोधा

खासदार तडस यांचा मुलगा अन् सून

खासदार तडस यांच्या कौटुंबिक वादात मोठा ट्विस्ट, मुलगा-सुनेचं वैदीक पद्धतीनं लग्न

sakal_logo
By
टीम ई सकाळ

वर्धा : खासदार रामदास तडस (MP Ramdas Tadas) यांची सून पूजा हिचा एक व्हिडिओ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ट्विट केला होता. त्यामध्ये सुनेने गंभीर आरोप केले होते. तसेच चाकणकर यांच्याकडे मागणी केली होती. दरम्यान, खासदार रामदास तडस यांनी या प्रकरणाशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे.

हेही वाचा: 'रामदास तडस' प्रकरणावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?;पाहा व्हिडिओ

या पीडितेशी पंकज तडस यांचा प्रेमविवाह झाला होता. या विवावाहासाठी त्यांनी घरच्यांचा विरोधही पत्करला होता. यामुळे हे दोघे वर्ध्यात वास्तव्यास होते. येथे त्यांच्यात वाद वाढत गेले आणि हा वाद पोलिसांपर्यंत गेला. गेल्या ३ सप्टेंबरला पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, पंकज तडस यांनी काही वर्षांपूर्वी वर्ध्यातील मुलीला लग्नाचे अमिष देऊन लैंगिक शोषण केले. यात तिला गर्भधारणा झाली. यानंतर तिने लग्नाची गळ घातल्याने तिच्याशी लग्न केले. लग्नानंतर ते दोघे देवळीचे घर सोडून वर्धा येथे राहत होते. येथे तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला व तिला बेदम मारहाण करून घरातून हाकलल्याचा आरोप पीडितेने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत केला होता. या तक्रारीवर वर्धा पोलिसांनी काहीच कारवाई करण्यात आली नाही, असे नमूद करून तिने थेट नागपुरात पोलिस महानिरीक्षकांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर रुपाली चाकणकर यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी पूजाचा एक व्हिडिओ ट्विट करत भाजपचे खासदार रामदास त़डस यांच्या मुलावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर तडस यांच्यावर राजकीय दबाव आल्याचे बोलले जात आहे. व्हिडिओनंतर अवघ्या १२ तासातच पंकज तडस आणि पूजा हिचा वैदीक पद्धतीने विवाह पार पडला. तक्रार होताच प्रकरण चर्चेत आले. यात आता खासदारांनी पुढाकार घेत विवाह लावून दिल्याने सध्या हा वाद मिटल्याचे बोलले जात आहे.

पूजाकडून तक्रार मागे

हा विवाह सोहळा पार पडल्यानंतर पूजा यांनी आता आपली कुठलीही तक्रार नाही असं सांगून आपली तक्रारही मागे घेतल्याची माहिती आहे. मला खूप भीती वाटली होती आणि त्यामुळे आपण तक्रार दिली होती. आता पंकज यांच्याबद्दल आपली कुठलीही तक्रार नाही असं पूजा यांनी म्हटल्याची माहिती आहे.

loading image
go to top