MSRTC Action against ST bus driver if dont stop on Bus stand
MSRTC Action against ST bus driver if dont stop on Bus stand

MSRTC : बस न थांबविल्यास कारवाई

वाहकही दोषी : प्रत्येक मार्गावरील प्रवासी उचलण्याचे निर्देश

नागपूर : राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)‘गाव तिथे एसटी’ ही संकल्पना राबवीत आहे. मात्र, चालक गावातील लहान थांब्यावर बस न थांबविता थेट पुढे निघून जातात. अशाप्रकारच्या कित्येक तक्रारी महामंडळाला प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे महामंडळाने थांब्यावर बस न थांबविल्यास चालकाला दोषी धरून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये वाहकाला सुद्धा दोषी धरण्यात येणार आहे.

प्रवाशांच्या सोईसाठी थांबे निश्चित करण्यात आले असल्याने अशा ठिकाणी बस थांबविणे चालकाचे प्रथम कर्तव्य आहे. प्रवासी थांब्यावर बसेस न थांबविल्याबाबतच्या तक्रारी महामंडळाकडे येऊ लागल्या आहेत. त्यामुळे चालकांना याच्या सूचना देण्यात आल्या आहे. बरेचदा चालक महामार्गावरील उड्डाणपुलावरून गाडी थेट नेतात. त्यामुळे उड्डाणपुलाखाली असलेल्या थांब्यावर बस थांबत नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते. बसची वाट पाहत प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागते. गावातील आतमधल्या रस्त्यावर लहान थांबे आहेत. प्रवासी न पाहताच चालक गाडी दामटतात.

त्यामुळे एसटीची वाट पाहणाऱ्या खेड्यापाड्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय होते. अशा गावांमध्ये एसटी शिवाय वाहतुकीचा दुसरा पर्याय राहत नाही. याबाबत बऱ्याच तक्रारी प्राप्त झाल्याने महामंडळाने नियोजित थांब्यावर बस न थांबविल्यास चालकांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. मार्ग तपासणीत किंवा तक्रारीत चालक दोषी आढळल्यास चालकावर कठोर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर वाहकाला सुद्धा दोषी ठरविण्यात येईल.

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ व ‘गांव तिथे एसटी’ अशी संकल्पना राबवून महामंडळ प्रवाशांच्या सेवेला व सुविधेला प्राधान्य देत आहे. मात्र, कर्मचाऱ्यांकडून प्रवासी हित जोपासत नसल्याचे आढळून आल्यास महामंडळाने आता कठोर पवित्रा घेतला आहे. तशा सूचना महामंडळाने सर्व आगार व कार्यालयाला दिल्या आहेत.

प्रवासी रस्त्यावर आहे. त्यांना घेतलेच पाहिजे. त्यावर कुठलीही हयगय खपवून घेतली जाणार नाही. याची गंभीर दखल घेऊन चालक आणि वाहक दोघांवरही कारवाई करण्यात येईल. चालक-वाहकांना सूचना आहेत की, प्रत्येक मार्गावरील प्रवासी उचलायला हवा. नियोजित बस थांब्यावर बस थांबायलाच हवी.

- गजानन नागुलवार, विभागीय नियंत्रक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com