

Chandrapur
esakal
मूल: शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील गडचिरोली मार्गावरील उमा नदीच्या पात्रालगत उभारण्यात आलेल्या स्मशानभूमीची दुरवस्था आणि अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या लाकडांच्या टंचाईमुळे मूलवासींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या स्मशानभूमीत मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असून, दुसरीकडे वनविभागाकडेही लाकडांची कमतरता निर्माण झाल्याने अंत्यसंस्काराचे सोपस्कार पार पाडणे नागरिकांसाठी कठीण झाले आहे.