esakal | अमरावती विभागातून मुंबई एपीएमसीवर यांनी मारली बाजी
sakal

बोलून बातमी शोधा

यवतमाळ : संचालक म्हणून विजयी झाल्यानंतर प्रमाणपत्र स्वीकारताना प्रवीण देशमुख व इतर मान्यवर.

देशातील सर्वांत मोठ्या समजल्या जाणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व आले आहे. अमरावती विभागातील दोन्ही जागा आघाडीने जिंकल्या आहेत. या निवडणुकीत यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख व बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचे बंधू माधवराव जाधव विजयी झाले आहेत.

अमरावती विभागातून मुंबई एपीएमसीवर यांनी मारली बाजी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : सहकार क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची मतमोजणी सोमवारी (ता. दोन) मुंबई येथे झाली. मतमोजणीत अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडी पॅनेलचे वर्चस्व दिसले.

अमरावती महसूल विभागातील दोन जागांसाठी 26 अर्ज दाखल झाल्यानंतर निवडणुकीत चुरस होईल, असा अंदाज होता. मात्र त्यातील 19 जणांनी माघार घेतल्यानंतरही निवडणूक आखाड्यात सात उमेदवार कायम होते.

शेगावचे पाटील व नेरचे ढवळे यांचे आव्हान

शेगावचे पांडुरंग पाटील व नेरचे भाऊराव ढवळे यांचे आव्हान आघाडीच्या उमेदवारांना होते. यात भाऊराव ढवळे यांनी आपला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे उत्सुकता कमी झाली. मात्र, चुरस कायम होती. शनिवारी (ता. 29) जिल्हा उपनिबंधक कार्यालयात मतदान झाले. जिल्ह्यात 99 टक्के मतदान झाले. त्यामुळे विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.


सोमवारी झाली मतमोजणी

सोमवारी (ता. 2) नवी मुंबई कांदा, बटाटा मार्केट येथे मतमोजणी झाली. अमरावती महसूल विभाग मतदारसंघातील आघाडीचे दोन्ही उमेदवार सुरुवातीपासूनच आघाडीवर होते. प्रवीण देशमुख यांना 488, तर माधवराव जाधव यांना 437 मते मिळाली. पांडुरंग पाटील यांना 341 मते मिळाली. एकूण 697 मतांपैकी 696 मते वैध ठरली; तर एक मत अवैध ठरले. निवडणूक निर्णय अधिकारी एस. एम. पाटील यांनी विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र दिले. यावेळी पणन महासंघाचे संचालक सुरेश चिंचोळकर, आनंदराव जगताप, नगरसेवक दिनेश गोगरकर, श्रीकांत देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

असे घडलेच कसे? : ठाण्यातच दोघांची जुंपली, अन्‌ बघून घेतो अशी दिली धमकी!

प्रवीण देशमुख यांना सर्वाधिक मताधिक्‍य

मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीत यंदा सर्वाधिक मताधिक्‍य अमरावतीच्या प्रवीण देशमुख यांना मिळाले आहे. यापूर्वी अपक्ष म्हणून ते सर्वाधिक मताधिक्‍यांनी बाजार समितीवर विजयी झाले होते. गेल्यावेळी वडिलांचे निधन झाल्याने दहा दिवस ते प्रचारात नव्हते. ही संधी साधत त्यांचा "राजकीय गेम' करण्यात आल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.