
नाना देवळे
मंगरूळपीर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गेल्या अडीच-तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील काही महिन्यांत होण्याची शक्यता आहे. पालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश शासनाकडून मिळाल्याने प्रशासकीय पातळीवर त्यासाठीच्या हालचालींनी वेग घेतला आहे. दुसरीकडे निवडणुकांबाबतची अनिश्चितता दूर झाल्यामुळे पालिका निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशींग बांधून बसलेले अनेक इच्छुक उमेदवार पुन्हा सक्रिय झाले आहेत.