युवा स्वाभिमानची भाजपसोबत युतीचे संकेत; मनसेही शर्यतीत

अमरावती महापालिका
अमरावती महापालिकाअमरावती महापालिका
Updated on

अमरावती : महापालिकेच्या आगामी निवडणुकीत युवा स्वाभिमान पक्षाची भाजपसोबत युती होण्याचे संकेत आहे. युवा स्वाभिमानकडून तशा हालचाली सुरू झाल्या आहे. पुढील आठवड्यात होत असलेल्या संयुक्त बैठकीत या मुद्द्यावर आणखी स्पष्टता येणार आहे.

विद्यमान स्थितीत महापालिकेत युवा स्वाभिमान पक्षाने भाजपसोबत आघाडी केली आहे. या पक्षाचे सभागृहात तीन सदस्य आहेत. भाजपनेही मित्रधर्म निभावत विषय समितीचे सभापतिपद व स्थायी समितीत सदस्यांना स्थान दिले आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेचा भाजपसोबत ब्रेकअप झाल्याने सभागृहात सेना विरोधी पक्षाच्या बाकावर आहे. पंचवीस वर्षांची युती संपुष्टात आली असून, भाजप सध्या एकटा आहे.

अमरावती महापालिका
...अन् पतीने फोडला हंबरडा; अपघातात गर्भवतीसह बाळाचा अंत

आगामी निवडणुका तीन सदस्यीय पद्धतीने होणार आहे. प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वर्ष २०१७ मध्ये झालेल्या चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे भाजपला एकहाती सत्ता मिळवता आली. तर युवा स्वाभिमानला केवळ तीन जागा जिंकता आल्या होत्या. तरीही युवा स्वाभिमानने वरिष्ठ पातळीवरील मधुर संबंधांचा उपयोग करीत भाजपसोबत मैत्री करून पदे पदरात पाडून घेतली.

आगामी निवडणुकीत भाजपसोबत युती असावी, असा युवा स्वाभिमानमधील काहींना वाटते, तर भाजपच्या स्थानिक काही पदाधिकाऱ्यांचे युवा स्वाभिमानसोबत युती नसावी, असे मत आहे. अमरावती व बडनेरा विधानसभा मतदारसंघात दोन्ही पक्षाची किती शक्ती आहे याचा अदमास घेण्यात येत असला तरी तो स्पष्ट आहे.

बडनेरा मतदारसंघात विधानसभा युवा स्वाभिमानने जिंकली असली तरी मनपात त्यांचे केवळ तीन सदस्य आहेत. अमरावतीत भाजपचा पराभव झाला असला तरी मनपात प्राबल्य आहे. आगामी निवडणुकीत युती करताना व जागा वाटपात या मुद्द्यांवर विचार होणार आहे. त्यामुळे किती जागा द्यायच्या, येथे युतीचे घोडे अडण्याची शक्यता आहे.

मनसेही शर्यतीत

वरिष्ठ पातळीवर मनसे-भाजप अधिक जवळ येत असल्याने या पक्षांच्याही युतीचे संकेत आहेत. महापालिकेत आजपर्यंत मनसेला कधीच यश मिळालेले नाही. मात्र, प्रत्येक निवडणुकीतील त्यांचा सहभाग व उत्साह उफाळून येतो. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर या दोन पक्षांची युती होण्याचे संकेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com