Vidarbha News: आता वाहनांसाठी तासागणिक मोजावे लागणार पैसे; मेहकर पालिकेचा उपक्रमः विनामूल्य पार्किंगला चाप

Mehkar Municipality Introduces Hourly Parking Charges: मेहकर नगरपरिषदेने नगरपरिषद कार्यालयाच्या परिसरात पार्किंग शुल्क लागू केले आहे. लहान वाहनांसाठी ३० रुपये प्रति तास आणि मोठ्या वाहनांसाठी ५० रुपये प्रति तास शुल्क आकारले जातील.
Vidarbha News

Vidarbha News

esakal

Updated on

मेहकर: शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नगरपरिषद कार्यालयाचा परिसर आता मोकळा श्वास घेणार आहे. पालिकेच्या मैदानात अस्ताव्यस्त उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे होणारी कोंडी फोडण्यासाठी मुख्याधिकारी

रामराजे कापरे आणि विद्यमान पालिकेच्या बॉडीने एक धाडसी निर्णय घेतला आहे. या मैदानात वाहन उभे करण्यासाठी ‘पार्किंग शुल्क’ (पार्किंग चार्ज) लागू करण्यात आले असून, या स्तुत्य उपक्रमाचे शहरात स्वागत होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com