esakal | महानगरपालिका करणार मालमत्ता सिल
sakal

बोलून बातमी शोधा

The municipality will seal the property

 महानगरपालिका हद्दीतील थकीत मालमत्ता कराच्या सक्तीच्या वसुलीसाठी महानगरपालिकेतर्फे झोननिहाय मोहीम राबविली जाणार आहे. सोमवारपासून ही मोहीम सुरू होत आहे. नोटीस बजावण्यात आलेल्या मालमत्ताधारकांनी त्यांच्याकडील थकीत कराचा भरणा न केल्यास मालमत्ता सिल करण्याची कारवाई कर विभागातर्फे केली जाणार आहे. 

महानगरपालिका करणार मालमत्ता सिल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला :  महानगरपालिका हद्दीतील थकीत मालमत्ता कराच्या सक्तीच्या वसुलीसाठी महानगरपालिकेतर्फे झोननिहाय मोहीम राबविली जाणार आहे. सोमवारपासून ही मोहीम सुरू होत आहे. नोटीस बजावण्यात आलेल्या मालमत्ताधारकांनी त्यांच्याकडील थकीत कराचा भरणा न केल्यास मालमत्ता सिल करण्याची कारवाई कर विभागातर्फे केली जाणार आहे. 

मालमत्ता कराची वसुली नसल्याने महानगरापालिकेला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यातही 70 टक्क्यांपेक्षा अधिक कर वसुलीचे व थकीत कराच्या वसुलीचे मोठे आव्हान महानगपालिका प्रशासनापुढे आहे. जवळपास 30 दिवसांमध्ये सुमारे 100 कोटीपेक्षा अधिक वसुलीचे लक्ष्यांक मनपा कर विभागाला साधावे लागणार आहे. त्यासाठी थकीत कर असलेल्या मालमत्तांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. नोटीस मिळाल्यानंतरही कर भरणा न करणाऱ्यात आलेल्या मालमत्ता सिल करण्याची कारवाई सोमवारपासून सुरू होणाऱ्या विशेष कर वसुली मोहिमेदरम्यान केली जाणार आहे. 

दररोज प्रत्येक झोनमध्ये 50 नोटीस
महानगरपालिका झेत्रातील चारही झोनमध्ये दररोज प्रत्येकी 50 नोटीस थकीत मालमत्ता करासाठी बजावल्या जात आहेत. आतापर्यंत दोन हजारांच्यावर नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे. 

झोननिहाय पथक
कर वसुलीसाठी महानगरपालिकेच्या चाही झोनमध्ये पथक गठीत करण्यात आले आहे. हे पथक नोटीस बजावण्यात आल्यानंतरही कर भरणा न करणाऱ्या मालमत्ता सिल करण्याची कारवाई सोमवारपासून करणार आहे. 

सक्तीच्या वसुलीशिवाय पर्याय नाही
महानगरपालिकेच्या आर्थिक उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत मालमत्ताकर आहे. यावर्षी अनेक कारणांनी वसुलीचे प्रमाण कमी आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे वसुलीला विलंब झाला. आता आर्थिक वर्षाच्या शेवटी सक्तीच्या वसुलीशिवाय पर्याय नाही. सोमवारपासून वसुली मोहीम सुरू करीत आहो. नागरिकांनी मालमत्ता कराचा भरणा करून अप्रिय कारवाई टाळावी. 
 - वैभव आवारे, उपायुक्त, मनपा
 

loading image
go to top