अमरावती : पत्नीचा मृतदेह बेडवर तर पतीचा मृतदेह फासावर लटकलेला आढळला होता. त्याप्रकरणी नांदगावपेठ पोलिसांनी आत्महत्या करणाऱ्या पतीविरुद्धच हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
अमोल सुरेश गायकवाड (वय-३५, रा. रहाटगाव), असे हत्येचा गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती नांदगावपेठ पोलिसांनी दिली. रविवारी (ता. २३) रहाटगाव मार्गावरील प्रज्ज्वल पाथरे (वय ३५) यांच्या शेतातील फार्महाऊसच्या वरच्या खोलीत अमोल गायकवाड (वय ३५) यांचा मृतदेह फासावर लटकलेला