esakal | शेतकरी दाम्पत्य करीत होते काम; पतीचा आवाज येत नसल्याने पत्नीने जाऊन बघितले असता झाला डोळ्यांसमोर अंधार
sakal

बोलून बातमी शोधा

Murder of a farmer at Kordi in Rajura taluka

पत्नीने आरडाओरड केली असता शेतातील मजूर गोळा झाले. घटनेची माहिती गडचांदूर पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी घटनास्थळी पाहणी करीत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला.

शेतकरी दाम्पत्य करीत होते काम; पतीचा आवाज येत नसल्याने पत्नीने जाऊन बघितले असता झाला डोळ्यांसमोर अंधार

sakal_logo
By
श्रीकृष्ण गोरे

राजुरा (जि. चंद्रपूर) : कोरपना तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या नांदगाव (सुर्या) येथील शेतकरी शंकर फोफरे (वय ४५) हे शनिवारी तीन किमी अंतरावर असलेल्या कोराडी गावानजीक असलेल्या शेतात काम करीत होते. दुपारी एक वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी डोक्यावर व गळ्यावर धारदार शस्त्रांनी वार करून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर हे नेहमीप्रमाणे सकाळी शेतात गेले होते. त्यांची पत्नी त्यामागून जेवणाचा डब्बा देऊन लगतच्या शेतात कापसाची वेचणी करीत होती. काहीही कळण्याच्या आत शंकर फोफरे यांच्यावर अज्ञान व्यक्तीने धारदार शस्त्राने डोक्यावर व गळ्यावर वर करून हत्या केली. काही वेळांनी आवाज येत नसल्याने पत्नीने घटनास्थळाकडे येऊन पहिले असता पती रक्ताने माखून मृतावस्थेत दिसले.

विदर्भातल्या ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा

पत्नीने आरडाओरड केली असता शेतातील मजूर गोळा झाले. घटनेची माहिती गडचांदूर पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी घटनास्थळी पाहणी करीत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला.

घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक गोपाल भारती करीत आहे. शांत व संयंमी स्वभावाने नांदगाव येथे परीचित असलेले शंकर फोफरे यांच्या हत्येने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संपादन - नीलेश डाखोरे