भाईगिरीच्या वादातून खून; चौघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

अमरावती : शहरात गल्लीबोळात भाईगिरी फोफावली असून, त्यातून कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्‍नही गंभीर होत आहे. यशोदानगरात भाईगिरीच्या कारणावरून शनिवारी (ता. 14) रात्री खून झाला. भूषण अनिल बांबूर्डे (वय 20) असे मृत युवकाचे नाव आहे. फ्रेजरपुरा पोलिसांनी अल्पवयीनासह चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली.

शनिवारी (ता. 14) रात्री सव्वा दहाच्या सुमारास हा हल्ला झाला. गंभीर जखमी भूषणचा उपचारादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात रात्री साडेअकराच्या सुमारास मृत्यू झाला. भूषणचा भाऊ रोहन उर्फ रोशन अनिल बांबूर्डे (रा. संजयगांधीनगर) याचे शनिवारी दुपारी ऋतिकसोबत क्षुल्लक कारणावरून भांडण झाले होते. त्या भांडणाचा बदला घेण्यासाठी ऋतिक भालेकर तीन साथीदारांसह रात्री सव्वादहाच्या सुमारास यशोदानगरात आला. त्यावेळी भूषण बांबूर्डे हा गुणवंतबाबा पानमंदिरजवळ बसला होता. चौघांनी भूषणसोबत वाद घातला. त्याला मारहाण केली. त्याचवेळी ऋतिकने चायना चाकूने भूषणच्या मांडीत वार केला. घाबरून भूषण दूरपर्यंत पळाल्यामुळे घटनास्थळी रस्त्याने रक्त सांडलेले दिसले. जखमी स्थितीत त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री सव्वाअकराला भूषणचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये ऋतिक सिद्धार्थ भालेकर, विशाल धनराज गडलिंग व मंगेश बाबूलाल तायडे (तिघेही रा. पंचशीलनगर) यांच्यासह एक अल्पवयीनाचा समावेश आहे. तिघांनाही रविवारी (ता. 15) तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर हजर केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder through the guise of brotherhood; All four arrested

टॅग्स