परप्रांतीय तरुणाचा धारदार शस्त्राने भोसकून खून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

शुक्रवारी परिसरात रस्त्यालगत पकडून दोन ते तीन मारेकऱ्यांनी तीक्ष्ण शस्त्राने त्याच्या गळ्यावर व पोटावर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सूरज याचा जागीच मृत्यू झाला. वैमनस्यातून हा खून झाल्याची शक्‍यता आहे. 

भंडारा : शहरातील गजबजलेल्या वस्तीत भरदिवसा धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना आज दुपारी तीनच्या सुमारास घडली. गेल्या पंधरवड्यातील डॉ. हेडगेवार चौकातील खुनाची घटना ताजीच असताना या खुनाच्या दुसऱ्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. 

सूरज यादव (वय 35) असे मृताचे नाव आहे. मृत सूरज हा परप्रांतीय तरुण शुक्रवारी भागात भाड्याने राहत होता. तो खासगी कंपनीत कंत्राटी तत्त्वावर कामावर असल्याची माहिती आहे. आज दुपारी तीनच्या सुमारास शुक्रवारी परिसरात रस्त्यालगत पकडून दोन ते तीन मारेकऱ्यांनी तीक्ष्ण शस्त्राने त्याच्या गळ्यावर व पोटावर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सूरज याचा जागीच मृत्यू झाला. वैमनस्यातून हा खून झाल्याची शक्‍यता आहे. 

हेही वाचा : महाविकास आघाडीला बदनाम करण्याचे षड्‌यंत्र : कोण म्हणाले असे...

याबाबत माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी रीना जनबंधु, ठाणेदार लोकेश कानसे कर्मचाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीची पाहणी व घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या घटनेतील मारेकरी फरार असून भंडारा पोलिस त्यांचा शोध घेत आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The murder of a young man