Fertilizer Shortage in Kodegaon : खताच्या बोऱ्यांची फोडाफोड! कोदेगावात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
Maharashtra Farmer : खापा येथील शेतकरी चंद्रकांत धनमारे यांच्या खताच्या ५० पोत्यांवर अज्ञात व्यक्तीने फाडफाड व जाळपोळ केली. या घटनेमुळे पेरणीपूर्वीच मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
Farmers in Distress as Fertilizer Bags Torn in Kodegaonesakal
खापा : कोदेगाव येथील शेतकरी चंद्रकांत धनमारे यांच्या शेतातील खताची पोती एका अज्ञात विक्षिप्ताने जाळून व फाडून फेकून दिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी (ता.१) रात्रीच्या सुमारास घडली असल्याचे समोर आले आहे.