
चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून ''जीपीएस टॅग'' लावून सोडण्यात आलेल्या ''एन-११'' या मादी गिधाडाने चक्क पाच राज्यांतून चार हजार किलोमीटरचा प्रवास करून थेट तामिळनाडू गाठले. मात्र, या मादी गिधाडाचा विजेच्या स्पर्शाने गुरुवारी मृत्यू झाल्याची वार्ता सायंकाळी चंद्रपुरात धडकताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.