

Vidarbha News
esakal
वर्धा: राष्ट्रीय, राज्य महामार्गांवर सातत्याने घडणाऱ्या भीषण अपघातांमागे वेग किंवा चालकांची चूक एवढीच कारणे नसून, महामार्गावरच बेवारसपणे उभी असलेली नादुरुस्त ट्रक, ट्रेलर व अन्य जडवाहने ही गंभीर समस्या बनू पाहत आहे. वाहन बिघडल्यावर ते उभे ठेवताना कोणतेही चेतावणी फलक, रिफ्लेक्टर, ब्लिंकर किंवा लाल दिवे लावले जात नाहीत. अशी वाहने अपघाताचे कारण ठरत आहेत.
विशेषतः रात्रीच्या वेळी, पहाटेच्या सुमारास, धुके किंवा पावसामुळे दृश्यता कमी असताना असे उभे ट्रक-ट्रेलर मृत्यूचे सापळे ठरत आहेत. महामार्गावर प्रवास करणाऱ्या कार, जीप, दुचाकी व हलक्या वाहनांना या नादुरुस्त वाहनांचा अंदाज येत नाही.