
नागपूर : मंदिरांचे शहर भासावे इतकी मंदिरे असलेल्या नागपुरात जागनाथ बुधवारी येथे गोंडकालीन प्राचीन मंदिर आहे. येथे साडेसात शिवलिंग आहेत. हे मंदिर जागृतेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते. १६८०ला याची स्थापना झाल्याचे सांगण्यात येते. नागपुरात तेव्हा गोंड राजांचे राज्य होते. हे नागपुरातील पहिले शिवमंदिर असून नागपूरचे ग्रामदैवत आहे, अशी काहींची मान्यता आहे.