Nagpur : सुलभ शौचालयातून अंघोळ करून आलिशान बाईकने निघायचा

तरुणींना द्यायचा महागडे गिफ्ट, चोरी करणारा निघाला ‘शाहरुख’ ‘एमडी’वरच दररोज २० हजारांचा खर्च ‘शाहरुख’ ला एमडीचे व्यसन होते. त्यातून तो दररोज किमान २० हजार एमडीवर खर्च करायचा.
bike thief
bike thiefsakal

नागपूर - युवकांवर चित्रपटांमधील नायकांची मोठी क्रेझ असते. अनेकदा त्यांच्यासारखे वागून मिरविण्यात त्यांना मोठा आनंद असतो. त्यातून आपली हौस भागवित अगदी हिरोप्रमाणे वावरण्यासाठी चोरी सारखे गुन्हे करताना दिसून येतात. असाच ऐशोआरामासाठी चोरी करीत, त्यातून तीन मुलींना फिरविणारा ‘शाहरुख’ पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.

खदान परिसरात एका खंडरमध्ये राहणारा ‘शाहरुख’वर सात ठिकाणी चोरी केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या छावणी परिसरातील अचरज टॉवर येथील फार्मसीच्या दुकानात पाच लाखांची चोरीचा गुन्ह्यात त्याला अटक केली.

यावेळी तपासणीत अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शाहरुखला ‘एमडी’चे व्यसन आहे. मात्र, त्याला दुसरी नशा ही ‘लॅव्हिश लाईफ’ जगण्याची होती. त्यातून सकाळी एका सुलभ शौचालयातून अंघोळ करून अगदी टिपटॉप कपडे आणि सुटाबुटात आलिशान बाईकवरून शहात फिरायला निघायचा.

सुलभ शौचालयातून आंघोळ करून आलिशान बाईकने निघायचा

त्याच्या आलिशान लाईफवर इम्‍प्रेस होत तीन मुलींशी त्याने मैत्रीही केली. त्यातून त्यांनाही मोठमोठे गिफ्ट आणि हॉटेलमध्ये जेवायला तो घेऊन जायचा. आपल्या लॅव्हीश लाईफमुळे तो कदाचित चोर असेल कुणालाही वाटले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com