Nagpur Power Plant Ash Collection : वीज केंद्रातील राख कुणीही न्या! जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांचा निर्णय
Dr. Vipin Itankar Latest Decision : कोराडी आणि खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्पांतून निर्माण होणारी कोळशाची राख आता उद्योजकांसाठी मोफत उपलब्ध करुन दिली जाणार आहे. राखचा उपयोग विटाभट्टी, सिमेंट पाइप, पेव्हर ब्लॉक आणि बांधकाम क्षेत्रासाठी उपयुक्त ठरणार आहे.
खापरखेडा : कोराडी व खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्पातून दररोज निर्माण होणारी हजारो मेट्रिक टन कोळशाची राख आता कोणत्याही उद्योजकाला मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी घेतला आहे.