डॉन आंबेकरविरोधात आणखी एक गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

नागपूर : बंदुकीच्या धाकावर एका अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार केल्याप्रकरणी डॉन आंबेकरविरोधात आज सोमवारी आणखी एक गुन्हा दाखल केला. 

नागपूर : बंदुकीच्या धाकावर एका अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार केल्याप्रकरणी डॉन आंबेकरविरोधात आज सोमवारी आणखी एक गुन्हा दाखल केला. 
वर्षभरापूर्वी पीडितेला तिच्या परिसरात राहणाऱ्या आरोपी विवेक सिंह याने आमिष देऊन जाळ्यात अडकविले व अत्याचार केला. काही काळानंतर विवेकने पीडितेची ओळख आंबेकर याच्यासोबत करून दिली. आंबेकरनेही पीडितेवर बंदुकीच्या धाकावर अत्याचार केला व कुणाला काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. यामुळे पीडिता घाबरून शांत होती. पोलिसांनी आंबेकरला जेरबंद केल्यानंतर अनेक प्रकरणे बाहेर येत असून यामुळे पीडितेने हिंमत करून आंबेकरविरोधात लकडगंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, don santosh ambekar, crime, rape